थरारक पाठलाग | सावंतवाडी पोलिसांची धाडसी कारवाई

Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2025 10:35 AM
views 254  views

सावंतवाडी : गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी आंबोली घाटाच्या पायथ्याशी नानापाणी या ठिकाणी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे २५० दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली अँबेसिडर कार जप्त करण्यात आली आहे.

अटक आरोपी प्रवीण ईश्वर जाणवेकर (वय ५०), संतोष दिनकर माने (वय ४४) दोन्ही राहणार इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असून गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे २ लिटर, ७५० मिली आणि १८० मिली क्षमतेच्या एकूण सुमारे २५० बाटल्या. व‌ वाहन अँबेसिडर कार (क्रमांक MH 12 JA 4490) आहे.

आरोपी हे अँबेसिडर कारमधून गोवा ते इचलकरंजी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आंबोली चेक पोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी MH 12 JA 4490 या गाडीला तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून चालकाने कार थांबवण्याऐवजी ती रिव्हर्स घेऊन घाट खाली उतरवण्यास सुरुवात केली. यावर तत्परता दाखवत पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. अखेरीस, दानोळी ट्राफिक चेक पॉइंटवरील अंमलदार - जमादार आंबेरकर आणि हवालदार रुक्मानंद मुंडे यांच्या मदतीने नानापाणी या ठिकाणी या वाहनाला थांबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही  कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या पथकातील उपनिरीक्षक सरदार पाटील, अंमलदार हवालदार रामदास जाधव, गौरव परब आणि दानोळी ट्राफिक चेक पॉइंटचे अंमलदार यांनी या कामगिरीत सक्रिय सहभाग घेतला.