
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख हे आजारपणामुळे औषधोपचारासाठी बाहेर जात असल्याने वरिष्ठ उपाध्यक्ष विलास गावडे यांना जिल्हाध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. गणेश पाटील यांनी जारी केले असून त्यांनी श्री. गावडे यांना अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.










