
सावंतवाडी : गणेश चतुर्थीचा उत्सव संपून आता दिवाळीही जवळ आली असली, तरी शहरातील रस्त्यांवरील खड्डे यथावत आहेत. त्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. पावसाळा संपल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन नगरपरिषदेने लेखी पत्राद्वारे दिले होते.
अद्याप काम सुरू झालेले नसल्याने "पाऊस थांबूनही खड्डे बुजवण्यासाठी अजून कोणाची वाट पाहत आहात?" असा सवाल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी जाधव यांनी नगरपरिषदेला उपस्थित केला आहे.दरम्यान, शहरातील शालेय विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना या खड्ड्यांमुळे दररोज त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रवी जाधव यांनी केली आहे.










