गणित संबोध परीक्षेत मिलाग्रीसचं यश

Edited by: विनायक गांवस
Published on: October 12, 2025 15:58 PM
views 77  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ मार्फत इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या गणित संबोध परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधून एकूण 35 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,पैकी 33 विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये मयुरेश राकेश मोर्ये व अथर्व सखाराम गावडे यांनी 92 गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे तर वीर वामन राऊळ याने ९० गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे तर गौरांग शिवनाथ टोपले,कृती तेजस टोपले आणि मनवा अभिषेक सावंत यांनी 88 गुण मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले आहे.

तसेच या परीक्षेमध्ये इयत्ता आठवी मधून 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,पैकी 22 विद्यार्थ्यी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये जानवी सुरेश गवंडे आणि शुभंकर सुदीप पाटकर यांनी 94 गुण मिळवून प्रथम स्थान तर आयुष ऋषिकेश गावडे यांनी 92 गुण मिळवून द्वितीय स्थान आणि तेजल बाबुराव जाधव व शॉन हरकुलनजॉन रॉड्रिग्स यांनी 90 गुण मिळवून तृतीय स्थान पटकावले आहे.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना श्रीम. प्रणाली रेडकर व श्रीम. फ्लोरिंडा फर्नांडिस तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना श्री. बॉनी डिसोजा व मार्टिन डेसा यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदाना,पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.