भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे वेंगुर्ल्यात आयोजन

Edited by: दिपेश परब
Published on: October 12, 2025 10:48 AM
views 268  views

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला येथील क्रीडाप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असून या स्पर्धेसाठी ₹30 हजार व चषकाचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

शुक्रवार व शनिवार 17 व 18 ऑक्टोबर 2025 रोजी हे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसे आणि चषक ठेवण्यात आले आहेत. प्रथम ३० हजार व चषक, द्वितीय २० हजार व चषक, तृतीय व चतुर्थ ७ हजार व चषक असं राहणार आहे‌. याव्यतिरिक्त, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बेस्ट अटॅकर, बेस्ट सेटर, बेस्ट लिबेरो, आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यांसारखी वैयक्तिक आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. 

कॅम्प व्हॉलीबॉल मैदान, वेंगुर्ला हायस्कूल शेजारी, सायं. 6 वाजता सामने सुरू होतील. संघ नोंदणीची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2025 असून युवा नेते, भाजपा महाराष्ट्र येथील विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील तसेच बाहेरील संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क हेमंत गावडे: 9421235128, सॅमसन फर्नाडिस: 8412876603 यांना करावा, संघ नोंदणीसाठी 16 ऑक्टोबर 2025 ही अंतिम मुदत असून, कोणत्याही संघाला सामन्यात डायरेक्ट एंट्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी असे आवाहन केलं आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे