'तो' मृतदेह सापडला

Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2025 15:02 PM
views 135  views

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावात काल रात्री उडी मारून आत्महत्या केलेल्या रिक्षाचालक रमेश जाधव यांचा मृतदेह अखेर सापडला आहे. 

आज सकाळपासून शोधमोहीम सुरू केली होती. दुपारी मृतदेह आढळला. त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा सुरु असून शहरात त्यांच्या आत्महत्येचा टोकाच्या निर्णयामुळे हळहळ व्यक्त होत आहे.