
सावंतवाडी : आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून १९ रोजी मोती तलाव सावंतवाडी शिवरामराजे भोसले पुतळा ते सारस्वत बँक येते भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. ही स्पर्धा खुला गट व बाल गट अशी घेतली जाणार आहे.
मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक २५,००० द्वितीय क्रमांक १५००० तृतीय क्रमांक १०,००० असे ठेवण्यात आले आहेत. तर बालगटासाठी प्रथम क्रमांक १०,००० द्वितीय क्रमांक ७००० तृतीय क्रमांक ५००० अशी तीन बक्षीस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आम्ही सावंतवाडीकर मित्र मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी संबंधित मंडळांनी हितेन नाईक-: 8291494897, साईराज :8698289634 या नंबरावर नाव नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.










