
सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन, सावंतवाडी यांच्या वतीने कै. सौ. विजयश्री जयानंद मठकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन सत्रात या वर्षी ''कोंकण व गोमंतकाच्या लोकसाहित्यातील स्त्रीजीवन'' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
दरवर्षी महिला व मुलांच्या आरोग्य, कायदे, समस्या आणि कौटुंबिक जीवनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणाऱ्या या उपक्रमांतर्गत, यावर्षी गोव्यातील लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या आपल्या परिसरातील पारंपरिक लोकसाहित्यातील स्त्रियांचे दर्शन घडवणार असून गोमंतकीय लोकसाहित्य आणि लोककलांवर त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य आहे. ज्येष्ठ साहित्यिक सौ. उषा परब या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. कोंकण व गोमंतकाच्या लोकसाहित्यातील स्त्रीजीवन या विषयावर हे व्यख्यान होणार असून शनिवार, दि. ११ ऑक्टोबर, २०२५ सायंकाळी ६.०० वा. श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसाद पावसकर (अध्यक्ष, श्रीराम वाचन मंदिर),अॅड. संदीप निंबाळकर (कार्याध्यक्ष, श्रीराम वाचन मंदिर), रमेश बोंद्रे (कार्यवाह, श्रीराम वाचन मंदिर) प्रा. प्रवीण बांदेकर (ज्येष्ठ साहित्यिक, सावंतवाडी) यांनी केल आहे.










