
सावंतवाडी : कॅथॉलिक पतसंस्थेचा 32 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या प्रधान कार्यालयात रेव्ह.फा मिलेट डिसोजा यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली व संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्राहक, सभासदांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. केवळ 32 वर्षांच्या कालावधीत व फक्त 07 शाखांच्या माध्यमातून संस्थेने आज ₹ 450 कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्याऱ्या संस्थेच्या सर्व सभासद ग्राहक, हितचिंतक तसेच कर्मचाऱ्यांचे मी मनःपुर्वक आभार मानते असे अध्यक्षा श्रीम. आनमारी जाॅन डिसोजा यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
तसेच संस्थेला २०२४-२०२५ या आर्थिक वर्षांत चांगल्या कामगिरीमुळे राज्य पातळीवर "महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन" कडून पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण १३ ऑक्टोबर २०२५ रोजी गोकर्ण, महाबळेश्वर कर्नाटक येथे होणार आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.










