
सावंतवाडी : सावंतवाडीच्या सांस्कृतिक जडणघडणीत तरुणाई पेलत असलेली जबाबदारी सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले आहे. मळेवाडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मळेवाड-जकात नाका येथे श्री गणेश मित्रमंडळातर्फे एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला श्री. परब यांनी आपली उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्जउभारणीतून वाद्ये खरेदी करत सुरु केलेल्या श्री स्वामी समर्थ बिट्सचे देखील उद्घाटन त्यांनी याप्रसंगी केले.
या त्यांच्या कृतीने युवक भारावून गेले. मेहनतीतून उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना उभारी मिळावी हीच आपली इच्छा असल्याचे सांगत यावेळी विशाल परब यांनी वाद्यवादनाचा आनंदही लुटला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे, नंदू नाईक,गुरु नाईक, अमोल नाईक, प्रीतम गावडे, राहुल नाईक,प्रतीक नाईक, राज नाईक, वैभव नाईक, योगेश कारुडेकर, राजाराम नाईक, उत्तम नाईक,लक्ष्मण नाईक, भाई गावडे, राज नाईक, विद्याधर नाईक, अनिकेत नाईक,स्वदेश नाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.










