
सावंतवाडी : जिल्हा बँक टिकली पाहिजे ही माझी भावना आहे. ती भावना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवणार आहे. गेले ८ महिने नाबार्ड, रिझर्व्ह बँकसह माझा पत्रव्यवहार सुरू आहे. सीएम, डीसीएमच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा ठरवली जाईल, अस मत शिवसेना नेते, माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सीबीआयची मला कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. नितेश राणेंच्या दबावाखाली जिल्हा बँकेने दोन वेळा पोलिस ठाण्यात देखील तक्रारी केल्या आहेत. चौकशीत त्याचा काही उपयोग झाली नाही. त्यानंतर हा पत्रव्यवहार करण्यात आला. यानंतर मी भूमिका मांडली होती. पोलिस महासंचालक, एसपी, आयजींकडे बँकेतील प्रकाराबाबत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. प्रवेश करण्यापूर्वी ही मागणी केली होती. आज मी युतीमध्ये आहे, त्यामुळे यावर जास्त बोलू शकत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून, त्यांच्या कानावर हा विषय घालून ते मार्गदर्शन करतील तशी पुढची दिशा राहील. हे आजच नसून ८ महिने नाबार्ड, रिझर्व्ह बँकसह माझा पत्रव्यवहार सुरू आहे. ही जिल्हा बँक व कोकणातील सहकार टीकावा यासाठी माझा प्रयत्न आहे. बँक व नितेश राणेंनी चूक केल्यानं मला हे उघड करावं लागलं आहे. बँक टिकली पाहिजे ही माझी भावना आहे. ती भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे पोहोचवणार अशी माहिती शिवसेना नेते, माजी आमदार राजन तेली यांनी दिली.










