
सावंतवाडी : येथील स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने शनिवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ‘स्नेह संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन नॅब सभागृह, नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि माजी शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था. बाळ परब, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांडुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत उच्चगावकर,उपाध्यक्ष सौ.पल्लवी केसरकर तसेच संस्थेचे संचालक मंडळाने केले आहे.










