पीक पाहणी नोंदणीची २० सप्टेंबर अंतिम मुदत

Edited by: विनायक गांवस
Published on: September 16, 2025 18:57 PM
views 18  views

सावंतवाडी :  ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा नोंदणी करण्यासाठी २० सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याचं आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या पिकांची नोंदणी तात्काळ करावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

येत्या चार दिवसांत, म्हणजेच २० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात असलेल्या पिकांची अचूक माहिती ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवणं आवश्यक आहे. या नोंदीमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्यास, पीक कर्ज घेण्यास आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत होते. यामुळे प्रशासकीय स्तरावर शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती नोंदवणे सोपे जाते आणि त्यांना भविष्यात अनेक फायदे मिळू शकतात. त्यामुळे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या पिकांची नोंदणी तात्काळ करावी असं आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केलं आहे