
सावंतवाडी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील वयोगट मुले या गटामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी कु.रोहन अजय घावरे याने रायफल शूटिंग मध्ये पिप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड.शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर प्रशिक्षक कांचन उपरकर क्रीडा शिक्षक भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.