
सावंतवाडी : गृह राज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे आपल्या खात्या अंतर्गत आढावा बैठक घेत आहेत. यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निवास्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी केसरकर समर्थकांनी श्री. कदम यांच्याकडे एकनाथ शिंदे यांना आम. केसरकरांना मंत्री करण्यास सांगा, अशी मागणी केली.
औपचारिक चर्चा दरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी दीपक केसरकर यांना मंत्रिपद द्यावं, पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी पोहोचवा असे आवाहन श्री. कदम यांना केले. दीपक केसरकर यांच्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना आहे. ते कधी काही मागणार नाहीत, असं सांगताना महिला आघाडीच्या अनारोजीन लोबो यांना अश्रू अनावर झाले. यावेळी एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांवर अन्याय करणार नाहीत. मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी त्यांना देतील, हा माझा विश्वास अस राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.