
सावंतवाडी : नेमळे सिद्धार्थनगर येथील मूळ रहिवाशी व कामानिमित्त मुलुंड-मुंबई येथे वास्तव्यात असणारे ललित विश्राम नेमळेकर यांचा एकुलता एक मुलगा लतीत (वय 25) याचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत खाजगी रुग्णालयात निधन झाले.
एका खाजगी कंपनीत सेवेत असणारा शांत, संयमी, मनमिळावू व परोपकारी सदा हासतमुख असणाऱ्या या तरुणाचे आकस्मिक निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज रविवारी सकाळी मुलुंड स्मशान भूमीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, काका, काकी, आजोबा, आजी, चुलत भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त पदवीधर प्राथमिक शिक्षक तथा भारतीय बौद्ध महासभेचे सावंतवाडी शाखाध्यक्ष विजय नेमळेकर यांचा तो सख्खा पुतण्या होता.