'त्या' विधानाचा भाजपाकडून निषेध

Edited by: विनायक गांवस
Published on: September 14, 2025 18:01 PM
views 172  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर काँग्रेसने केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा भाजप सावंतवाडी विधानसभेच्या माध्यमातून तीव्र निषेध करण्यात आला. 'मातृशक्तीचा सन्मान' या शीर्षकाखाली आयोजित केलेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत, देशातील समस्त मातृशक्तीचा सन्मान राखण्याचे आवाहन केले.

भारतीय संस्कृतीने नेहमीच मातेला सर्वोच्च स्थान दिले आहे, असे सांगत भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी काँग्रेसने केलेल्या विधानाचा निषेध केला. "पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असले तरी, ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मातेबद्दल अपशब्द वापरणे, किंवा चुकीचे चित्रण करणे, हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर, देशातील समस्त मातृशक्तीचा अपमान आहे," असे त्या म्हणाल्या. बिहार निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने द्वेष पसरवून मातृशक्तीचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. मातृशक्तीचा सन्मान करणे हे आपल्या संस्कृतीचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडू, असे सौ. कोरगावकर यांनी सांगितले.

सावंतवाडी येथे झालेल्या या निषेध आंदोलनात भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा चिटणीस महेश धुरी व सुधीर दळवी, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर , आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर , दोडामार्ग मंडल अध्यक्ष दिपक गवस , महीला मोर्चाच्या मोहीनी मडगांवकर - सुजाता पडवळ - वृंदा गवंडळकर - चेतना रजपूत - मेघना साळगांवकर - दिपाली भालेकर - सुनयना काटकर - प्राजक्ता केळुसकर - मेघा भोगटे - वंदना किनळेकर - समिधा नाईक - सावित्री पालेकर , निलेश सामंत , मनवेल फर्नांडिस , अशोक सावंत , शितल राऊळ , साईप्रसाद नाईक , सुहास गवंडळकर , संतोष नानचे , उमेश पेडणेकर , चंद्रकांत मळीक , रविंद्र मडगांवकर , अजय गोंधावळे , बाळा आकेरकर , संजु शिरोडकर , दिलीप भालेकर , अँड. परिमल नाईक , पंकज पेडणेकर , बाळु शिरसाठ , प्रमोद गावडे , दादा परब , मधुकर देसाई , वसंत तांडेल , रमेश दळवी , आनंद नेवगी , देवेंद्र शेटकर , पराशर सावंत , प्रणव वायंगणकर , संदिप नेमळेकर , प्रवीण देसाई , निलेश पास्ते , आनंद तळणकर , राजबा सावंत , हनुमंत पेडणेकर तसेच सावंतवाडी विधानसभेतील जिल्हा पदाधिकारी , जि.का.का.सदस्य , मंडल पदाधिकाऱ्यांसह विविध मोर्चा, आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते .