रघुनंदन परब यांचे निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 14, 2025 17:50 PM
views 443  views

सावंतवाडी : आरोस माऊलीवाडी येथील रहिवासी रघुनंदन उर्फ नंदू मोहन परब ( वय ४८ ) यांचे अल्पशा आजाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आई मुलगा पुतण्या असा परिवार आहे ते राजकारणात व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होते. उबाठा सेनेचे परशुराम उपरकर यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.काही काळ त्यांनी मनसेमध्ये आरोस गावचे शाखाप्रमुख म्हणूनही काम केले होते.आरोस गावात होणार्‍या विविध कार्यक्रमात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग होता.