
सावंतवाडी : शिवसेना शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबु कुडतरकर यांच्या शिफारशीनुसार माजी मंत्री, आमदार दीपक केसरकरांच्या माध्यमातून लाखे वस्तीच्या शालेय मुलांना नवरात्रीसाठी लेझीम साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष बाबु कुडतरकर, भारती मोरे, अनारोजीन लोबो, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, सुप्रीता धारणकर,पुजा नाईक, लतिका सिंग,भारती परब, ज्योत्स्ना मेस्त्री, आरती खोरागडे, सुलोचना गावडे,राजश्री निर्गुण, कृष्णा लाखे, संजय पेडणेकर, मार्टिन आदी उपस्थित होते