
सावंतवाडी : शहरातील गांधी चौक परिसरात रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी महत्त्वाचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. या कामांतर्गत जुना वीज पोल बदलला जाणार आहे.
यामुळे गांधी चौकातील बाजारपेठ, उभा बाजार आणि रघुनाथ मार्केट या परिसरातील वीजपुरवठा सकाळी १०:३० ते दुपारी २:३० पर्यंत बंद ठेवला जाणार आहे. महावितरण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे. नागरिकांनी या वेळेची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.