
सावंतवाडी : गणेश विसर्जन मार्गावर आंबोली गुरववाडी येथील रस्ता कुंपण घालून तो बंद केल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुळवंतवाडी (गुरुववाडी) येथील नागरिकांनी याविरोधात आवाज उठवत, रस्ता मोकळा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात, अनेक वर्षांपासून वापरला जाणारा सार्वजनिक रस्ता ग्रामपंचायतीने बंद केल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. गणेश विसर्जनाच्या काळात होणारी अडचण आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन, हा रस्ता तातडीने पूर्ववत खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आंबोली ग्रामपंचायत च्या २३ नंबर ला रस्ता नोंद झाली आहे. मात्र या रस्त्यावर कुंपण घालून बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.










