
सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक कुंडांमध्ये करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, "आमच्या घरची श्री गणेश मूर्ती शाडू मातीची होती आणि ती आम्ही नैसर्गिक कुंडांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित केली." गणेश विसर्जनाच्या वेळी आमदार केसरकर यांच्यासोबत त्यांचे बंधू, पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला. यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर व केसरकर कुटुंबिय उपस्थित होते.