
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून घरोघरी तसेच विविध सामाजिक - सांस्कृतिक मंडळांमध्ये बाप्पाचे दर्शन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन भाजप युवा नेते विशाल परब यांनी गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. परब यांनी यावेळी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.










