मी नारायण राणेंचा सच्चा कार्यकर्ता : गुरुनाथ मठकर

Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2025 19:43 PM
views 177  views

सावंतवाडी : शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्याच काम करताना पक्षाचे सदस्य केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वॉर्डमधून मताधिक्य मिळवून दिल असतानाही मला नाहक बदनाम केले. मला पक्षातून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मी नारायण राणेंचा सच्चा कार्यकर्ता आहे अन् राहणार आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक गुरुनाथ मठकर यांनी दिली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांचेबरोबर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये हजर राहून पक्ष विरोधी काम केल्याब‌द्दल भाजपा कार्यकर्ते गुरुनाथ मठकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्याच काम मी केलं. सर्वांधीक सदस्य पक्षात घेतले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वॉर्डमधून महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून दिलं, असे असतानाही मला नाहक बदनाम करून पक्षातून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मी नारायण राणेंचा सच्चा कार्यकर्ता आहे अन् राहणार आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक श्री. मठकर यांनी दिली.