
सावंतवाडी : कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरन्यायाधीश श्री. गवई यांचा विविध जिल्ह्यातील वकील संघटनेच्यावतीनं सन्मान करण्यात आला. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याचे संकेत सरन्यायाधीश गवई यांनी दिल्याने त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक अराधे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहूराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करत ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सांगलीचे अध्यक्ष ॲड. अशोक वाघमोडे, सातारा अध्यक्ष ॲड. सयाजी घाडगे, रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, पंढरपूरचे अध्यक्ष ॲड. विकास भोसले, सिंधुदुर्गचे अमोल सामंत यांची उपस्थिती होती. या सोहळ्याला कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नेते, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.