ओटवणेतील अण्णा गावकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 22, 2025 11:39 AM
views 182  views

सावंतवाडी : ओटवणे येथील रवळनाथ देवस्थानचे मानकरी बापू उर्फ अण्णा  सदू गावकर - मळेकर ( वय ८२) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ओटवणे गावच्या धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. 

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन आठवड्यापूर्वीच ३० जुलै रोजी त्यांच्या पत्नी सौ सत्यवती गावकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. येथील टेम्पो चालक बाबा मळेकर, गवंडी कारागीर राजन गावकर, ओटवणे हायस्कूलचे कर्मचारी मंगेश गावकर, चंद्रकांत गावकर यांचे ते वडील होत. ग्रामपंचायत सदस्या सौ मनाली गावकर यांचे ते सासरे तर सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांचे ते मावसे होत.