
सावंतवाडी : समाज आणि शाळा यांचे नाते अत्यंत महत्वाचे आहे. समाजाच्या विकासासाठी शाळा महत्वाची भूमिका बजावते तसेच शाळा ही नवीन विचार आणि कल्पनाना प्रोत्साहन देते. या अनुषंगाने तिरोडा नं. १ या प्रशालेत आरती संग्रहाचे प्रकाशन प्रियांका सावंत, सरपंच संदेश केरकर उपसरपंच हेमंत आडारकर अध्यक्ष इत्यादींच्या हस्ते पार पडले. उपकमशील शिक्षक दिपक राऊळ यांच्या संकल्पनेतून शाळेची नाळ समाजाशी घट्ट जुळावी या उद्देशाने आरती संग्रहाच्या माध्यमातून शाळेतील नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती समाजापर्यंत पोहचवून शाळा आणि समाज यामध्ये सहकार्याची भावना अधिक निर्माण होते. या अनुषंगातुन प्रशालेने राबविलेले वैविध्यपूर्व उपक्रमासह आरती संग्रह प्रकाशित करून शाळेची ओढ समाजामध्ये अधिकच निर्माण झाली.
शाळेने राबविलेला हा उपकम स्तुत्य असून कौतुकास्पद आहे असे मत माजी सरपंच विश्वनाथ आडारकर यानी व्यक्त केले. तसेच शाळा आणि समाजाला जोडणारा हा उपक्रम असून पालक, ग्रामस्थ यांच्यासाठी नाविन्यपूर्ण आरती संग्रह उपयोगी असल्याचे मत उपसरपंच संदेश केरकर यानी व्यक्त केले. तर अशा प्रकारच्या आरती संग्रहाचे संपूर्ण गावाला वाटप करण्याबाबत ठरविण्यात आले. . या आरती संग्रहाचे प्रकाशन ज्ञानेश्वरी यांच्या प्रतिकात्मक ग्रंथांचे पूजन करून करण्यात आले.या लक्षवेधी ठरलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांची सुवर्ण सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त सामुदायिक पसायदानाचे गायन घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण करून प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी पोलीस पाटील लवू रगजी, सायली गावडे, ग्राम विकास अधिकारी मुकुंद परब, डॉ. सिद्धी शेटये, संगीता राळकर, नमिता सावंत, जोत्स्ना नवार श्री शिवाजी गावीत केंद्रप्रमुख निशा धुरी, सदाशिव परब, सिद्धी आडारकर, लतिका सातार्डेकर तसेच शाळा विद्यार्थी विकास व भौतिक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, शालेय मंत्रिमंडळ इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदवीधर शिक्षक दिपक राऊळ तर आभार जनार्दन प्रभू यानी मानले.