
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानाच्या ऐतिहासिक श्री देव पाटेकर मंदिरमध्ये श्रावण मास समाप्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पूजन व महाप्रसादाचे आयोजन राजवाडा येथे करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार श्री. दळवी म्हणाले, सावंतवाडी संस्थानाच्या राजमाता कै. श्रीमंत सत्यशिलादेवी भोसले यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा अनेक वर्षांपासून संपन्न होत आहे. संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी खेम सावंत भोसले, युवराज लखमसावंत भोसले, युवथाज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या सहकार्याने देव पाटेकराची सेवा आम्ही करत आहोत. इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत, जिल्ह्यातील जनतेला सुखी, समाधानी जीवन लाभो अस साकडं देव पाटेकराला घातल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले. शेवटच्या सोमवार निमित्ताने देवघरात देवदर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील भक्तांनी मोठी गर्दी केली होती. माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. यावेळी एल.एम.सावंत, रमेश गावकर , बाळु परब, रेमी आल्मेडा, मोरेश्वर पोतनीस, पुरोहित शरद सोमण आदींसह भक्तगण उपस्थित होते.
दरम्यान, माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पुजा, अभिषेक सोहळ्याचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. सकाळपासून भक्तिमय वातावरण परिसरात होते.