
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी महेश सारंग यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा केली.
महेश सारंग यांनी यापूर्वीही जिल्हा सरचिटणीस म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा विचार करून पक्ष नेतृत्वाने पुन्हा त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. सारंग यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष श्री. सावंत यांनी व्यक्त केला.