राजन म्हापसेकर चषक कबड्डी स्पर्धेत वालावल संघाला विजेतेपद

Edited by:
Published on: August 17, 2025 14:00 PM
views 50  views

सावंतवाडी : सावंतवाडी बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या 'श्री. दीपकभाई केसरकर पुरस्कृत कै. राजन म्हापसेकर स्मृती चषक २०२५' या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लक्ष्मी नारायण वालावल संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे हे ३१वे वर्ष होते. वालावल संघाने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आणि १०,००० रोख आणि कै. राजन म्हापसेकर स्मृती चषक जिंकला.

अंतिम सामन्यात गिरोबा सांगेली संघ उपविजेता ठरला. त्यांना  ५,००० रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत काही खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीने लक्ष वेधून घेतले. मालिकावीर म्हणून निखिल चव्हाण (वालावल), उत्कृष्ट पकडसाठी मयूर नाईक (सांगेली) आणि उत्कृष्ट चढाईसाठी अथर्व रणशिंग (वालावल) यांना गौरवण्यात आले. यावेळी बाजारपेठ मित्रमंडळाचे नंदकिशोर गावकर, शैलेश गवंडळकर, इनास माडतिस, आनंद पुनाळेकर, अजय गावकर, आनंद आयरे, शैलेश मेस्त्री, नरसिंह गवस आदी मान्यवर उपस्थित होते.