
सावंतवाडी : युवा नेते संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडीत होत असलेली ही भव्य दिव्य दहीहंडी पाहण्याचा योग आला. त्यांच्यामुळे आज सावंतवाडीत येता आलं. आपल्या माणसांसोबत असल्याचा अनुभव तुमच्यासोबत आला असं मत व्यक्त करत ''मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू ?'' असा डायलॉग मारत उपस्थितांची मने जिंकली.
दहिहंडीच्या शुभेच्छा देत संदीप गावडे यांचे आभार अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी मानले. ती म्हणाली, त्यांच्यामुळे मला सावंतवाडीत येता आलं. सावंतवाडीत येऊन आपल्या माणसांसोबत असल्याचं वाटलं, खूप छान वाटलं. ''कशे आसात बरे आसात मा सावंतवाडीकरांनू'' म्हणत आर्चीन उपस्थितांची मनं जिंकली. भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून येथील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला अभिनेत्री आर्चीनं भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी तीने मालवणीतून संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवा नेते संदीप गावडे, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर , दिलीप भालेकर, जितेंद्र गावकर , अनिकेत आसोलकर, सागर ढोकरे, चैतन्य सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.