सावंतवाडी पोलीस ठाण्यात बाळकृष्णाचं पूजन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 19:04 PM
views 165  views

सावंतवाडी : गोकुळाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने बाळकृष्णाचे पूजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पोलीस लाईन येथील मंदिरात हे पूजन केले.

यावेळी मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी बाळकृष्णाची पुजा केली. त्यानंतर मंत्रोच्चारांच्या गजरात कृष्णाचे विधिवत पूजन केले.

यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पूजनामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण भक्तिमय झाले होते.