संदिप गावडेंच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप उपक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2025 19:33 PM
views 171  views

सावंतवाडी : प्रतिवर्षी प्रमाणे संदिप गावडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी देखील श्री गावडे यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप उपक्रम राबवण्यात आला. 

सावंतवाडी  येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय शाळा क्र. ६ भटवाडी येथे वाह्यवाटप हा उपक्रम राबविण्यात आला. सन्मानिय प्रदेशाध्यक्ष व आमचे नेते रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात केले व त्याची व्याप्ती आता वाढलेली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होणे फार महत्वाचे आहे हाच उद्देश समोर ठेऊन मोफत वह्या वाटप उपक्रम दरवर्षी आम्ही राबवित असतो. अनेक कंपिटेटिव्ह स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन त्या दृष्टीने अभ्यास करावा अशी माझी ईच्छा आहे आणि हेच डोळ्यासमोर ठेऊन यावर्षीची वाह्यांची थीम देखील आम्ही देशातील विविध महत्वाच्या स्पर्धा परीक्षा अशी ठेवलेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुक मुलांना देखील सहकार्य करण्यास मला आनंद होईल असे श्री गावडे म्हणाले. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, अनिकेत आसोलकर, ॲड. चैतन्य सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.