श्रावण सोमवार निमित्त युवा रक्तदाता संघटनेकडून महाप्रसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: August 11, 2025 17:20 PM
views 213  views

सावंतवाडी : श्रावण सोमवार निमित्ताने सावंतवाडीकरांचे आराध्य दैवत श्री देव पाटेकरच्या कृपाशीर्वादाने युवा रक्तदाता संघटनेकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला 

राजवाडा येथे या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुरोहित बाळू कशाळीकर यांनी हा महाप्रसाद तयार केला होता. शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रावण सोमवार निमित्ताने देव पाटेकराच दर्शन घेण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. युवराज लखमराजे भोंसले व राजघराण्याचे युवा रक्तदाता संघटनेच्या या उपक्रमास सहकार्य लाभले.

यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, मेहर पडते, अनिकेत पाटणकर, गौतम माठेकर, राघवेंद्र चितारी, सुरज मठकर, दिग्विजय मुरगोड, वसंत सावंत, देवेश पडते, प्रथमेश कुडतरकर, अभिजित गवस, प्रसाद नाटेकर, शंभू विर्नोडकर, प्रतिक कोरगावकर, ऋषिकेश भांबुरे, रोहीत राऊळ आदी युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य उपस्थित होते.