
सावंतवाडी : आंबोलीमधिल मॅरेथॉन स्पर्धेस बेळगाव, हुबळी, धारवाड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांतून तब्बल ६०० स्पर्धक सहभागी झाले होते. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आम.दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी केसरकर आणि सावंत यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. ही स्पर्धा आंबोलीच्या जकातवाडी येथून सुरू झाली. सुरुवातीला ३२ किमी, त्यानंतर १५ किमी, ७ किमी आणि शेवटी ५ किमी धावणाऱ्या लहान स्पर्धकांना झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.