मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्रॅा बक्षीसांचं वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: August 10, 2025 18:55 PM
views 769  views

सावंतवाडी : मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्रॅा विजेत्यांना मळेवाड येथील गजानन महाराज मंदीर येथे बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी संघटनेकडून नाभिक समाजातील व्यक्तींना उपयुक्त साहीत्य भेट देण्यात आले.या कार्यक्रमा वेळी निलेश परब,सुरेश पाटील,उत्तम न्हावेलकर,आनंद न्हावी आदी समाजातील महनीय व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.दरम्यान लकी ड्रॅा मध्ये भाग्यवान ठरलेले पहिल्या क्रमांकाचे बक्षीस सुनील न्हावेलकर, द्वितीय क्रमांक संदेश आरोसकर, तृतीय क्रमांक अजय तळवणेकर यांना बक्षीस मिळाले.

तसेचं इतर उत्तेजनार्थ बक्षीसेही वितरीत करण्यात आली. यावेळी नाभिक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष सदानंद पवार, शांताराम वेतुरेकर,दया वेंगुर्लेकर, चेतन तोरस्कर,हनुमंत कारीवडेकर, मळेवाड पंचक्रोशी विभाग अध्यक्ष अजय तळवणेकर,सुनील न्हावेलकर, पुरुषोत्तम न्हावी,आनंद न्हावेलकर, संदेश आरोसकर,नंदकिशोर चव्हाण, नवनाथ तिरोडकर, वसंत चव्हाण, अमित न्हावी,मनोहर कवठणकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ तिरोडकर यांनी केले.