माजगावात आरोग्य शिबिराला प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: August 10, 2025 18:47 PM
views 94  views

सावंतवाडी : सनोफी आणि पिरॅमल संस्था मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व आयुष्यमान आरोग्य माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सनोफी आणि पिरॅमल संस्था मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व आयुष्यमान आरोग्य माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने HB तपासणी व असांसर्गिक आजाराची तपासणी करण्यात आली. या शिबिराला माजगाव येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे शिबिर घेण्यासाठी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट ख्रिश्चनवाडी माजगाव गरड यांनी जागा उपलब्ध करून दिली. तसेच या उपक्रमाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे व शरदिनी बागवे यांनी हातभार लावला. या शिबिराला उपस्थित डॉक्टर सुप्रिया धाकोरकर (समुदाय आरोग्य अधिकारी) सौ प्रतिभा परब आरोग्यसेविका सौ शीला डिमेलो, नेहा सावंत, नम्रता सावंत अमिषा कुंभार, साहिल मोरजकर यांनी हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानण्यात आले.