
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा जिल्हा परिषद शाळा क्र. २ मधील अंगणवाडी क्र. १५ मध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात पारंपरिक रक्षाबंधन सोहळा साजरा केला. या कार्यक्रमात लहान मुलांनी आपल्या भावांना ओवाळून त्यांच्या मनगटावर राखी बांधली.
अंगणवाडी सेविका सौ. अनुराधा पवार आणि मदतनीस सौ. अमिषा सासोलकर यांनी पालकांच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वर्गात सुंदर रांगोळी काढून पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पाडला. यावेळी 'भावाला उदंड आयुष्य लाभो' असे गीत गात चिमुकल्यांनी एकमेकांना ओवाळले आणि राखी बांधून गोड भेटवस्तूंची देवाणघेवाण केली. या सोहळ्यात सावी नेवगी, गोरक्ष नाईक, समर्थ काष्टे, समर्थ नेवगी, जीविका कदम, अनिशा दापले, अनन्या चव्हाण, दुर्वा गावडे, दुर्वा कोरगावकर, दुर्वाश जाधव, श्रुती गावडे, प्रिशा देशमुखे, अर्पिता कडगावकर, साईशा चव्हाण यांसारख्या चिमुकल्यांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत त्यांच्या मातांनीही कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. यामध्ये सौ. जानवी गावडे, स्वानंदी नेवगी, हिना शेख, धनश्री पाटील, नेहा काष्टे, श्रेया नेवगी, आर्या मुंज, तन्वी कदम, ज्योती कदम, सानिका मातोंडकर, अन्विता गोरे, तेजस्विनी चव्हाण, आणि रेशमा मेस्त्री यांचा समावेश होता.या अनोख्या उपक्रमामुळे अंगणवाडीतील मुलांमध्ये भारतीय सण आणि परंपरांची ओळख निर्माण झाली.