मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण

मानाच्या सुवर्ण नारळाचं पूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: August 08, 2025 18:10 PM
views 300  views

सावंतवाडी : नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला. शेकडोंच्या उपस्थित हा नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले. 

पूजनानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. तदपुर्वी सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक वाजतगाजत मोती तलाव काठावर आल्यानंतर सावंतवाडी संस्थानच्या व मानाच्या नारळाची पूजा करण्यात आली. राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्या हस्ते पुजा, आरती करण्यात आली. त्यानंतर सोन्याचा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी तलावात नारळ अर्पण केले. यावेळी मोती तलावाभोवती मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, मोरेश्वर पोतनीस, सुंदर गावडे, शैलेश मेस्त्री, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस, सहायक पोलिस निरीक्षक श्री. खंदरकर, पोलिस हवालदार महेश जाधव, अमित राऊळ, पुंडलिक सावंत, पोलिस कॉन्स्टेबल श्री. कोरगावकर, महिला पोलिस हवालदार श्रीम पवार, पोलिस हवालदार श्री.राऊत, राजा राणे, वस, सचिन कुलकर्णी, भटजी सोमण आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.