
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने सावंतवाडी तालुका मर्यादित 'गुणगौरव सोहळ्या 'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भंडारी भवन, सावंतवाडी येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, सल्लागार, सर्व सदस्य आणि सर्व ज्ञाती बांधव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शनिवार ०९ ऑगस्ट रोजी मंडळाच्या कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांनी दुपारी २.३० वाजता पूर्व तयारी आणि आढावा बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदकर व सचिव दिलीप पेडणेकर यांच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.