एकनाथ नाडकर्णी यांनी घेतली पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट

पक्षातून निलंबन रद्द झाल्यानंतर सदिच्छा भेट घेत केली चर्चा
Edited by: विनायक गांवस
Published on: July 20, 2025 17:53 PM
views 221  views

कणकवली : भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी यांचे पक्षातून करण्यात आलेले निलंबन अलीकडेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रद्द केले. त्यानंतर आज एकनाथ नाडकर्णी यांनी दोडामार्ग येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह  कार्यकर्त्यांसह पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी एकदा नाडकर्णी यांना शुभेच्छा देत एकनाथ नाडकर्णी यांना शुभेच्छा देत पक्षकार्यासाठी पुन्हा सक्रिय व्हा असे सांगितले. 

गतवर्षी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षशिस्त भिंगाचा ठपका ठेवत एकनाथ नाडकर्णी यांचे भारतीय जनता पार्टीतून निलंबन करण्यात आले होते.त्यानंतर अलीकडेच श्री. नाडकर्णी यांनी पक्षाकडे निलंबन रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर 

सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांचे निलंबन रद्द केले होते. नाडकर्णी हे पक्षातील एक ज्येष्ठ पदाधिकारी असून, त्यांनी यापूर्वी पक्षासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच त्यांना  पक्षकार्यात पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले होते.

पालकमंत्र्यांच्या या भेटीवेळी एकनाथ नाडकर्णी यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस माजी अध्यक्ष सुधीर दळवी आंनद तळणकर, वैभव इनामदार संजय सातार्डेकर प्रकाश गवस संजय विरनोडकर कळणे सरपच श्री देसाई तळकट सरपच सुरेंद्र सावंत तुकाराम बर्डे आदी सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.