मोती तलावात तरुणाची उडी

Edited by: विनायक गावस
Published on: June 09, 2025 09:13 AM
views 604  views

सावंतवाडी : मोती तलावाच्या काठावरून पुन्हा एकदा त्या तरूणाने रविवारी उडी घेतली. नशेच्या धुंदीत तो असल्याचे दिसत आहे. काल याच ठिकाणी त्याला सुखरूप बाहेर काढले होते.

काल हाच तरूण तलावात कोसळला होता. सुभाष चव्हाण असे त्याचे नाव आहे. आज पुन्हा एकदा त्यानं याच ठिकाणी उडी घेतली. येथील नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढत चोप दिला. नशेच्या धुंदीत त्याच्याकडून हा प्रकार घडल्याचे दिसते.