अश्वत्थ मारूती मंडळातर्फे मान्यवरांचे सन्मान

Edited by:
Published on: April 14, 2025 13:32 PM
views 77  views

सावंतवाडी : अश्वत्थ मारूती भक्त मंडळ तर्फे बाळा सावंत दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोगाच आयोजन रविवारी करण्यात आले होता. याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळातर्फे उपस्थितांचे सत्कार करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, दशावतार कलावंत भाई शिर्के, अशोक पेडणेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी श्री. परब, डॉ. ऐवळे यांनी मनोगत व्यक्त केली. आभार देव्या सुर्याजी यांनी मानले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, दशावतार कंपनीचे मालक भाई शिर्के, सत्यवान बांदेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अशोक पेडणेकर, मांगिरीश रांगणेकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू मिशाळ, किशोर चिटणीस, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, अर्चित पोकळे, गौतम माठेकर, पांडूरंग वर्दम, देवेश पडते, विशाल चव्हाण आदी माठेवाडा, जुनाबाजार येथील नागरिक उपस्थित होते.