छत्रपतींना सावंतवाडीची खास भेट !

Edited by:
Published on: February 26, 2025 17:55 PM
views 274  views

सावंतवाडी : खासदार, छत्रपती उदयनराजे भोंसले महाराज यांची सातारा राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा यांच्यावतीने भेट घेण्यात आली. यावेळी राजेंना शुभेच्छा देण्यात आल्या. सावंतवाडीची ओळख असलेली लाकडी खेळणी भेट स्वरूपात देण्यात आली. 

यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना कार्यकर्ते यांची उदयनराजे यांनी चौकशी केली. सामाजिक कार्य संघटनेच्या माध्यमातुन अखंड चालू ठेवा, आपले सहकार्य तुम्हाला कायम मिळणार असे आश्वासन छत्रपतींनी दिले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना राज्य अध्यक्ष जितेंद्र खानविलकर, सिंधुदुर्ग शाखा जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर,उपाध्यक्ष मंगेश माणगांवकर, जिल्हा सचिव रामचंद्र कुडाळकर, कल्याण कदम, ज्ञानेश्वर पारधी, शिवा गावडे, पुजा सोन्सुरकर, संचिता गावडे,सेजल पेडणेकर, समिक्षा मोघे,संगीता पारधी, अंकिता माळकर, एकनाथ शेट्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होती.