तळवडेत बालसभेची स्थापना

Edited by:
Published on: February 21, 2025 15:22 PM
views 335  views

सावंतवाडी : ६ ते १८ वर्षा पर्यंतच्या मुलांना असणाऱ्या समस्या, त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, मार्गदर्शन याविषयीच्या मागण्या ग्रामपंचायत स्तरावर मांडण्यासाठी व समूह-ग्रामसंघ-प्रभागसंघ रचना समजण्यासाठी मुलांना हक्काचे व्यासपीठ म्हणून तळवडे येथे बालसभेची स्थापना करण्यात आली.

दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी उमेद अंतर्गत PRI-CBO अभिसरण प्रकल्प  जिल्हा- सिंधुदुर्ग , तालुका- सावंतवाडी येथे अनमोल  प्रभागसंघ तळवडे अंतर्गत समृद्धी ग्रामसंघ व तिरंगा ग्रामसंघ अंतर्गत बालसभा स्थापन करण्यात आली. समृद्धी ग्रामसंघ यांची सिद्धेश्वर बालसभा तसेच तिरंगा ग्रामसंघ यांची शिवबा बाल सभा या नावाने बालसभा सुरू करण्यात आली. 

यावेळी तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, तसेच ग्रामपंचायत सदस्य स्मिता परब, पोलीस निरीक्षक मुळीक, पोलीस पाटील मयुरी राऊळ, समृद्धी ग्रामसंघ सचिव प्रिया परब, तिरंगा ग्रामसंघ अध्यक्ष पल्लवी मेस्त्री, BM स्वाती रेडकर, तसेच CC सचिन नाईक सर, मेंटोर गिरीजा, BRP प्राची राऊळ, LRP मयुरी दळवी, अंगणवाडी सेविका, सर्व CRP व  सदस्य बाल सभेसाठी उपस्थित होते.

दोन्ही ग्रामसंघातून बाल सभेसाठी अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सहसचिव, आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. ही बालसभा महिन्यातून एक शनिवार संध्याकाळी 3.00 वाजता या वेळेत घेतली जाईल असे ठरवण्यात आले. तसेच या बाल सभेसाठी ग्रामसंघ मधील एक पदाधिकारी, सीआरपीताई तसेच एलआरपीताई उपस्थित राहतील असे ठरवण्यात आले. अशाप्रकारे शिवजयंतीच्या निमित्ताने समृद्धी ग्रामसंघाची सिद्धेश्वर बालसभा व तिरंगा ग्रामसंघाची शिवबा बालसभा स्थापन करण्यात आली. तसेच मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.