
सावंतवाडी : नगरपरिषद प्रशासन व ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नाहक त्रास शहरवासीयांनी होत असून रस्ते ओले करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. धुळीच्या साम्राज्यात शहरवासीय त्रस्त झालेत.
''एक त्रस्त सावंतवाडीकर रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने हैराण झालेला असून नगरपालिकेला अक्षरश:शिव्यांची लाखोली वाहत रस्त्यावर पाणी मारत आहे'' अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. धुळीच्या या साम्राज्यामुळे शहरवासीयांना मनस्ताप होत असून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.