आनंदोत्सव...प्रदर्शन आणि विक्री

Edited by:
Published on: December 08, 2024 12:37 PM
views 154  views

सावंतवाडी : नववर्ष अन् नाताळच्या उत्साहात भर घालण्यासाठी यावर्षीही आनंदोत्सव ''प्रदर्शन व विक्री''च आयोजन करण्यात आले आहे. हा आनंदोत्सव सावंतवाडीत होणार असून २७, २८ आणि २९ डिसेंबर २०२४ पर्यंत आर.पी.डी हायस्कुल येथे दुपारी ३ ते रात्री १०वाजेपर्यंत हे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनात दागिन्यांचे अद्वितीय कलेक्शन, हस्तकलेच्या वस्तू, एथनिक साड्या, 

गृहसजावट, ड्रेस मटेरियल, लहान मुलांचे कपडे, बॅग्स, डिझायनर साड्या, डिझायनर कपडे, ज्वेलरी, इंटेरिअर प्रॉडक्ट्स, मसाले, पॉटरी, पेंटीग्स, रेडीमेड ड्रेस, लाईव्ह पोट्रेट, कॅरिकेचर, टॅटु व मेहेंदी स्टॉल्स, मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल असणार आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या अन् आनंदोत्सव साजरा करा असं आवाहन आयोजकांनी केले आहे. या आनंदोत्सव प्रदर्शन सोहळ्यात आपल्या ब्रॅण्डची विक्री करायची असेल तर स्टॉलसाठी 9067927762 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन प्रिटी मून, सावंत आर्ट व सावंत क्रिएशनकडून करण्यात आले आहे.