सावंतवाडी वुडन क्राफ्टला जीआय मानांकन !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2024 10:30 AM
views 130  views

सावंतवाडी : सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनीच्या सावंतवाडी वुडन क्राफ्टला जीआय मानांकन प्राप्त झालं आहे. ही संस्था नाबार्ड व लुपीन फाउंडेशनच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी रजिस्ट्रेशन केली होती. त्यापूर्वी सुतार समाज हा पारंपरिक काम करत होता. सावंतवाडी राजघराण्याकडून आम्हाला प्रोत्साहन दिलं गेलं होतं. लाकडी खेळणी बनविण्याची कला ही जोपासली गेली होती. महाराष्ट्रातील ही एकमेव रजिस्टर कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण घेतली. लाकडापासून उत्पादित होणारी कला जपण्यासाठी कारागीर करतात.‌ त्यांच्या माध्यमातून ही संस्था स्थापन केली.

आज वुडन क्राफ्टला जीआय मानांकन दिल्याबद्दल शासनाचे आभार मानतो. सावंतवाडीतील चितारी बांधवांनी लाकडी खेळणी कला जोपासली. त्यांच्याकडे आमचे कारागीर आजही काम करत आहेत. ही कला जगभरात पोहचेल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या कंपनीच्या माध्यमातून आमच्या कारागीरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे अशी माहिती अध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी दिली. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले यांनी प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी प्रकाश मेस्त्री, महेश सुतार, गुरुनाथ मेस्त्री, दशरथ मेस्त्री, महादेव मेस्त्री, प्रशांत मेस्त्री, नारायण मेस्त्री, विष्णू मेस्त्री, जयवंत मेस्त्री, नंदकिशोर मेस्त्री, सुनिल मेस्त्री, राजू मेस्त्री, सोमा मेस्त्री आदी उपस्थित होते.