७ मे ला सावंतवाडी आठवडा बाजार बंद

Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 04:54 AM
views 134  views

सावंतवाडी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मंगळवार ७ मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी सावंतवाडी शहरातील आठवडा बाजार बंद ठेवला जाणार आहे‌. भारत निवडणूक आयोग, नवी  दिल्ली यांच्याकडील आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता आचारसहिंता लागू करण्यात आली आहे व 46 रत्नागिरी –सिंधुदूर्ग लोकसभा मतदान संघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रीया पार पाडली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये होणाऱ्या मतदानादिवशी सावंतवाडी शहरातील आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच या दिवशी भरवण्यात येणारा आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सावंतवाडी  शहरातील सर्व नागरीकांना तसेच आठवडी बाजारानिमित्त येणाऱ्या सर्व  खरेदी/ विक्रेत्यांना मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बुधवार ८ मे रोजी भरवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.