सावंतवाडी अर्बन बँक ठाणे जनता बँकेत विलीन होणार

Edited by: विनायक गावस
Published on: June 29, 2024 16:21 PM
views 143  views

सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक तब्बल 77 वर्षानंतर आता ठाणे जनता सहकारी बँकेत विलीन होणार आहे. हे विलीनीकरण रिझर्व बँकेच्या सूचनेनुसारच करण्यात येत आहे. रिझर्व बँकेने 30 दिवसांची मुदत आम्हाला दिली होती. त्यामुळेच आम्हाला हे विलीनीकरण करावे लागत आहे अशी माहिती अर्बनचे चेअरमन अँड. सुभाष पणदूरकर यांनी दिली. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रमेश बोंद्रे, उमाकांत वारंग आदी उपस्थित होते.


राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या बँकेच्या हितासाठी सात कोटी रुपये उभे करून दिले होते. परंतु, रिझर्व बँकेच्या नियमानुसार आता विलीनीकरण करावे लागत आहे असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.श्री.केसरकर पुढे म्हणाले, हे विलीनीकरण व्हावे अशी कोणाचीच इच्छा नव्हती. जर आम्हाला वेळ मिळाला असता तर आम्ही निश्चितपणे टार्गेट पुरेही केले असते. शासनाकडे आम्ही अर्बन बँकेला फिक्स डिपॉझिट उभे करण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणीही होती. परंतु आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही. मात्र, ज्या काही राज्यातील अर्बन बँक आहेत त्यांना काही देता येईल का या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत असेही ते म्हणाले.